Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedजंगलात मानवी सांगाडा आढळल्याने कोरची तालुक्यात खळबळ

जंगलात मानवी सांगाडा आढळल्याने कोरची तालुक्यात खळबळ

गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

कोरची तालुक्यातील अतिदुर्गम परिसरातील आंबेखारी गावानजीकच्या जंगलात जमिनीत अर्धवट अवस्थेत पुरलेला एका व्यक्तीचा सांगाडा आढळून आल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान सांगाडा बघणाऱ्या महिलेने तो सांगाडा आपल्या मुलालाच असल्याची शंका व्यक्त केली आहे.

आंबेखारी गाव कोरचीपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. आज आंबेखारी येथील दुलमाबाई कडयामी ही ५० वर्षीय महिला केरसुणी बनविण्यासाठी जंगलात गेली होती. तिला जमिनीत अर्धवट पुरुन ठेवलेला एक मानवी सांगाडा आढळून आला. तिने गावकऱ्यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर तहसीलदार प्रशांत गड्डम, पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे, वैद्यकीय अधिकारी श्रेया बुद्धे यांनी घटनास्थळी जाऊन सांगाडा ताब्यात घेतला.

यंदाच्या जुलै महिन्यात आंबेखारी येथील महेश कडयामी हा मयालघाट येथे अक्षय मडावी याच्यासमवेत मासेमारीसाठी गेला होता. परंतु नंतर तो घरी परतलाच नाही. तेव्हापासून त्याचा शोध घेणे सुरु होते. विशेष म्हणजे, आज महेशची आई दुलमाबाई कडयामी ही जंगलात केरसुणीचे गवत तोडण्यासाठी गेली असता तिलाच सांगाडा आढळला. हा सांगाडा महेशचाच असावा, अशी शंका तिने पोलिसांजवळ व्यक्त केली आहे.

आढळलेल्या सांगाड्याचे अवशेष डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. युवकाचा खून करुन जमिनीत पुरल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोरची पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!