आगार व्यवस्थापक गडचिरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे पालकांची मागणी.
चामोर्शी : तालुका प्रतिनिधी
मौजा कुनघाडा (रै.), ते गडचिरोली मार्गावरील कुनघाडा , नवेगाव , दर्शनी माल , गोविंदपुर , येवली , डोंगरगाव, शिवनी व वाकडी या गावावरून अंदाजे १०० ते १५० विद्यार्थी नियमित शाळेत ये- जा करतात. परंतु शालेय वेळेनुसार बसेस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये – जा करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचदा बसेस उशिरा आल्यामुळे विद्यार्थी शाळेत उशिरा पोहोचतात त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बाबीचा विचार करून शालेय विद्यार्थ्यांना रोज नियमित ये – जा करण्याकरिता सकाळी कुनघाडा मार्गे जाणारी मालेरमाल बस ही कुनघाडा येथून १०:३० वाजता निघून गडचिरोली येथे ११ ते ११:१५ पर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात यावी ,जेणेकरून विद्यार्थ्यांना सकाळी ११:१५ अ पर्यंत शाळेत पोहोचणे सोयीचे होईल आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच सायंकाळी परतीचे वेळेस मालेरमाल ही बस सायंकाळी ४:३० वाजता बस डेपो गडचिरोली येथून सोडण्यात यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेत ये – जा करणे सोयीचे होईल. अशी मागणी पालकांनी आगार व्यवस्थापक परिवहन महामंडळ गडचिरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.