Thursday, January 16, 2025
HomeUncategorizedगडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातही जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातही जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

 

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू, रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद

गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातही जाणवले. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.
अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात भूकंप जाणवल्याची चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!