अहमदनगर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
आगामी वर्षांसाठी भाजप मोठी योजना आखत असल्याचे समजत आहे. यामध्ये तरूणाईशी संपर्क वाढविण्यासाठी विशेष अभियान राबिण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
१२ जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजप हा एक मोठा उपक्रम हाती घेत आहे. विधानसभा निवडणुकीत भरभरून प्रतिसाद मिळाल्याने भाजप आणखी प्रयत्न करतांना दिसत आहेत. यातच आता स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजप एक मोठा उपक्रम हाती घेत आहे. १२ जानेवारी २०२५ रोजी शिर्डीत भाजपचं प्रदेश अधिवेशन होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
भाजपने आयोजित केलेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा देखील भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रभरातून १० हजार भाजप पदाधिकारी आणि तरूण कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम भाजपच्या आगामी योजनांसाठी महत्वाचा ठरणार आहे. ज्यामध्ये तरूणाईशी संपर्क वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.