देसाईगंज : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
येथिल वैनगंगा नदिच्या पुलावरुन चक्क नदीत उडी मारलेल्या महिलेचे प्राण वाचवून देसाईगंज पोलिसांनी पुन्हा एकदा माणुसकिचे दर्शन घडविले. नविन वर्षाची सुरुवात होतांना देसाईगंज शहर व परिसरात अनुचित घटना घडु नये यासाठी देसाईगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप आगरकर हे आपल्या कर्मचार्यांसह विर्शी टी पॉईंट परिसरात पेट्रोलिंग करत असतांना सायंकाळी 7 वाजता त्यांना नदीच्या पुलावरुन महिलेने उडी घेतल्याची माहिती मोबाईलवरुन मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता संदिप आगरकर ताफ्यासह नदिपात्राजवळ पोहचले.
नदीच्या पाण्यात एक महिला वाचवा-वाचवा, अशी ओरडत असतांना आगरकर स्वतः पाण्यात उतरले व सदर महिलेला पाण्याबाहेर काढुन पोलिस वाहनातून तातडीने देसाईगंज ग्रामिण रुग्णालयात भरती केले. डॉ. ईकबाल बेग यांनी सदर महिलेवर उपचार सुरु केले.
सदर महिलेचे नाव नेहा कुलदिप मेश्राम (28) असुन ती देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथिल रहिवासी असल्याची ओळख पटल्यावर पोलिसांनी तिच्या पतिला सदर घटनेची माहिती देऊन रुग्णालयात बोलावुन घेतले. सदर महिलेच्या कंबरेला व पायाला इजा झाल्याने पुढिल उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. नदिपात्रात उडी घेतलेल्या नेहाला पाण्याबाहेर काढतांना प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप आगरकर यांच्यासह पोलिस हवालदार, जिवन हेडाऊ, दिनेश राऊत, विलास बालमवार, मोरेश्वर चन्ने, जस्पाल चावला पंकज मेश्राम यांनी मदत केली. आगरकर यांनी घडविलेल्या माणुसकीच्या दर्शनाची नागरिकांकडुन प्रशंसा केली जात आहे. सदर प्रकरणाचा तपास कुरखेडाचे उपविभागिय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले तथा देसाईगंजचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक संदिप आगरकर करित आहेत.