Friday, February 14, 2025
HomeUncategorizedशूरवी महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

शूरवी महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

मूल : भगवान मोहुर्ले (शहर प्रतिनिधी)

३ जानेवारी २०२५: शुरवी महिला महाविद्यालय, मुल “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती” उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून गट समन्वयक गोंडवाना वीद्यापीठ (मुल,सावली, ब्रम्हंपुरी , घोडाझरी विभाग ) मा. श्रीमती शुभांगी नक्षिने यांनी उपस्थित राहून सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. मा. श्री.चेतन उंदिरवाडे सर यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक योगदान, सामाजिक क्रांतीतील महत्त्व आणि म. फुले यांच्या तीन पत्रातील मजकूर आणि आजच्या संदर्भातील उपयुक्तता सांगितली तसेच प्रा. सूर्यकांत सहारे यांनी स्त्रीसक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांवर सखोल व्याख्यान दिले. प्रा.कीर्ती वाडगुरे मॅडम यांनी सावित्रीबाईंच्या विचारांची आजच्या काळातील महत्त्वपूर्ण आवश्यकता स्पष्ट केली.तसेच प्रा.रुपाली वाढई मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी कु. नेत्रा येन्नावार कू. रीना यापाकुलवार कू. आरती कस्तुरे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या व ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व वंदनेनी झाली. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. हर्षा खरासे मॅडम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. महाविद्यालयाच्या प्रा.नम्रता वासनकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय करून दिला. याप्रसंगी मा.श्री स्नेहल भुते (कम्युनिटी मोबिलायझर गोंडवाना विद्यापीठ मुल ,सावली विभाग)डॉ.मीनाक्षी राईंचवार मॅडम प्रा.पल्लवी गांडाटे मॅडम मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नगिना चहांदे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.धनीला ढोले मॅडम यांनी केले. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी असा कार्यक्रम प्रेरणादायी ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.तर या कार्यक्रमास मोठया संख्येने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच विद्यार्थिनी उपस्थित होते. आरती कस्तुरे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या व ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व वंदनेनी झाली. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. हर्षा खरासे मॅडम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. महाविद्यालयाच्या प्रा.नम्रता वासनकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय करून दिला. याप्रसंगी मा.श्री स्नेहल भुते (कम्युनिटी मोबिलायझर गोंडवाना विद्यापीठ मुल ,सावली विभाग)डॉ.मीनाक्षी राईंचवार मॅडम प्रा.पल्लवी गंडाटे मॅडम मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नगिना चहांदे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.धनीला ढोले मॅडम यांनी केले. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी असा कार्यक्रम प्रेरणादायी ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.तर या कार्यक्रमास मोठया संख्येने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच विद्यार्थिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!