चिमूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चिमूर तालुक्यातील सावरगाव नेरी मार्गावरील सावरगाव गावाजवळ आज गुरूवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटून एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅक्टर चालक गंभीर आहे.
सचिन बापूराव मेश्राम (वय 30) रा. सावरगाव असे मृत्तकाचे नाव आहे.
चिमूर तालुक्यात रेती घाट लिलाव नसताना रात्रीच्या वेळेला रेती तस्करीचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. आज गुरुवारी (16 जानेवारी) च्या पहाटे सावरगाव येथे रेती टाकून,विना नंबरचे ट्रॅक्टर नेरीकडे परत भरधाव जात असताना सावरगाव समोरील छोट्या वळणावर अनियंत्रीत होऊन बाजूच्या शेतात ट्रॅक्टर पलटी झाला. एका मजुराचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला.
हा ट्रॅक्टर नेरी येथील अनिकेत जांभुळे यांच्या मालकीचा असून ट्रॅक्टर विना नंबरचा आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप ट्रॅक्टर मालकावर कारवाई करण्यात आलेली नव्हती. रेतीची अवैध वाहतूक करताना झालेल्या घटनांमध्ये हा तिसरा बळी ठरला आहे. खुलेआम रेतीची वाहतूक सुरू असतानाही महसूल प्रशासन गप्प आहे.