Friday, February 14, 2025
HomeUncategorizedवाळूघाट गौणखनिज उत्खननावर ड्रोनद्वारे नजर ठेवा

वाळूघाट गौणखनिज उत्खननावर ड्रोनद्वारे नजर ठेवा

नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

अवैध वाळू व गौण खनिजाच्या उत्खननावर आळा व दोषींवर तत्काळ कठोर कारवाई व्हावी. त्या दृष्टीने जिल्ह्यातील वाळूघाट व खदानींवर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिले आहेत.

वाळूघाट व गौण खनिज संदर्भात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड आदी उपस्थित होते.

ड्रोनद्वारे प्रत्यक्ष जागेवरचे फुटेज आपल्या हाती लागल्यामुळे गुन्हेगारांवर सप्रमाण गुन्हा सिध्द करण्यासह अशा कारवाईतील पारदर्शकता वाढीस लागेल. याचबरोबर शासनाच्या कारवाई पथकाला सुरक्षित राहून यामार्फत पुरावे गोळा करता येतील. वर्धित सुरक्षितेच्या दृष्टीने प्रगत सेन्सर आणि कॅमेऱ्यांनी सुसज्ज ड्रोनद्वारे वेळीच कारवाई करणे शक्य होईल. मनुष्यबळाच्या सहाय्याने तपासणीसाठी लागणारा वेळ आणि संसाधने ड्रोन तंत्रज्ञानातून मोठ्या क्षेत्राचे गतीने अचूक सर्वेक्षण करू शकतात. यात अचूकता असल्याने संबंधित गुन्हेगारांना वेगळा वचक निर्माण होईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.

जिल्ह्यात 40 रेतीघाट

जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत 40 वाळूघाट आहेत. या घाटावरुन यापुढे वाळूची तस्करी रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळेल. वाळूघाटासमवेत अवैध खनिज उत्खननाला मोठ्या प्रमाणात आळा घालता येईल, असा विश्वास विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!