गडचिरोली : उमेश गझलपेल्लीवार (जिल्हा प्रतिनिधी)
श्रद्धेय भागवत शिरोमणी ज्योतिषाचार्य गुरुदेव श्री श्री १०८ डॉ. पंडित चैतन्यराम गोस्वामीजी यांचे आशीर्वादाने प. विनोद बिहारी गोस्वामी यांच्या वाणीतून कथा वाचक चामोर्शी नगरीत प्रथमच ” श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह २२ जानेवारी ते २८ जानेवारी २०२५ पर्यंत बस स्टँड जवळील मंगलमूर्ति सुपर बाजार चे मागील खुल्या जागेवर आयोजित करण्यात आले आहे
या सात दिवसीय श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कालावधीतील २२ जानेवारी ते २८ जानेवारी २०२५ पर्यंत दुपारी ०१ वाजता ते ०५ वाजे पर्यंत कथामृत होणार तर २२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता भव्य कलश यात्रा येथील हनुमान मंदिर बाजार चौक येथून निघणार असून २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. या सप्ताह साजरा करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आले आहेत त्या समित्या प्रमुखाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत तरी जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचा धार्मिक लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ आयोजन समितीने केले आहे.