Friday, February 14, 2025
HomeUncategorizedआर्वीत घरकुल विषय खल्लास, ८ हजारांना मंजुरी

आर्वीत घरकुल विषय खल्लास, ८ हजारांना मंजुरी

वर्धा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

आपल्याला निवडून द्या तुमचे एकही मत वाया जाणार नाही. तुम्हाला पश्चाताप होणार नाही असा शब्द विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार सुमित वानखेडे यांनी दिला होता.

ते प्रत्येक शब्दावर खरे उतरत असून पहिल्या दोन महिन्यात आर्वी मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील ८ हजार घरकुल मंजूर करून आणले. आता मोजकेच घरकुल बाकी आहेत. तेही पूर्ण होतील, असा विश्वास आ. वानखेडे यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील गरजूंना वाट होती. त्यासाठी विधानसभा निवडणुकीत सुमित वानखेडे यांनी शब्द दिला होता. निवडून येताच त्यासाठी पाठपुरावा करून आर्वी तालुक्यात २,१३४, कारंजा ३००२ तर आष्टी तालुक्यात २,७३० घरकुल मंजूर करून आणले. आवास योजनेतील 90% यादी निकाली निघाले असल्याची माहिती आमदार सुमित वानखेडे यांनी दिली. आपण आपल्या निवडणुकीत एकाला हक्काचे घर मिळवून देण्याचा शब्द दिला होता तो आज पूर्ण झाल्याचा आपल्याला आनंद आहे. ही योजना आपल्या मतदारसंघात यशस्वी करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!