गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
वाळू तस्करांच्या विरोधात एल्गार पुकारला असून याच पार्श्वभूमीवर सकाळच्या सुमारास गडचिरोली शहरालगत असलेल्या कठाणी नदी घाटातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी रेती वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली होती.
त्यानुसार स्थानिक नायब तहसीलदार चंदू प्रधान यांनी घटनास्थळी पोहोचून सचिन पोहनकर, नामक ट्रॅक्टर क्रमांक एम एच 33 जी 1107,ला रंगेहात पकडून रेतीने भरलेले ट्रॅक्टर गडचिरोली तहसील कार्यालयात जप्त केले आहे.जिल्हाधिकारी रेती तस्करा विरोधाच्या नव्या धोरणानुसार अवैध रेती उत्खनननाला आळा घालण्याकरिता सकाळच्यावेळी कठाणी नदीतील घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती देण्यात आली होती. त्यानुसार महसूल विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारवाईत रेतीने भरलेले ट्रॅक्टर जप्त केल्याची घटना घडली आहे. ही कारवाई 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरातील हिरो शोरूम लझेंडा येथे स्थानिक महसूल येथून केली आहे.
पोलिसांनी रेतीसह पकडलेल्या ट्रॅक्टरच्या कारवाईत ट्रॅक्टर चालकासह ३ हमाल मजुरांविरुद्ध गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला, तर स्थानिक महसूल प्रशासन अंतर्गत केलेल्या कारवाईत रेतीसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, त्यानुसार स्थानिक नायब तहसीलदार चंदू प्रधान यांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅक्टर क्रमांक एम एच 33 जी 1107 रंगेहात पकडून रेतीने भरलेले ट्रॅक्टर गडचिरोली तहसील कार्यालयात जप्त करून ट्रॅक्टर चालकासह ट्रॅक्टर मालक नामदेव नैताम लांजेडा याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. रात्रीच्या सुमारास होतेय तस्करी – मागील काही दिवसांपासून गडचिरोली तालुक्यातील कठाणी व गुरुवाडा नदी वैनगंगा नदी घाटातून रात्रीच्या सुमारास रेती तस्करी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, स्थानिक महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाद्वारे रेती चोरीप्रकरणी केलेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.