गोंदिया : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील बबई गावातील येथील शेत शिवारात अज्ञात महिलेचा मृतदेह जळालेला अवस्थेत आढळून आला आहे. सकाळच्या सुमारास गावातील नागरिक शेताकडे जात असताना शेतात जळालेला अवस्थेत मृतदेह आढळून आला आला.
यासंदर्भात माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. मृतदेहाच्या कपड्यांच्या अवशेषावरूंन हा मृतदेह महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान हा मृतदेह नेमका कुणाचा, याचा पोलिस शोध घेत आहेत.