हत्ती रोगाला मुळा सकट नष्ट करा आरोग्य विभागाचे आव्हाहंन
मूल : रवि बरडे (तालुका प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागा तर्फे दर वर्षी हत्ती रोग निर्मूलन चे गोळया घरोघरी तथा प्रत्येक शाळेमध्ये जाऊन हत्ती रोग निर्मूलन चे गोळ्या वाटप केले जाते
आज मूल शहरात आरोग्य कर्मचारी यांनी सेंट अंने हायस्कुल मध्ये गोळ्या वाटपाचा कार्यक्रम घेऊन शाळेतील विध्यार्थी तथा शिक्षक व कर्मचाऱ्यांना हत्ती रोगाच्या गोळ्या खायला दिल्या महाराष्ट्र सरकार दर वर्षी हत्ती रोगावर नियंत्रण मिळविण्या साठी हजारो रुपये खर्च करित असतात परंतु नागरिक मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसतो यावेळेस आरोग्य कर्मचाऱ्यांनि चांगलीच मेहनत घेत शहरातील नागरिकांना आणि शाळेत जाऊन मुलांना हत्ती रोगाच्या गोळ्या देऊन हा रोग मुळासकट नष्ट करण्यासाठी आरोग्य कर्मचारी कामाला लागल्याचे दिसलें आरोग्य कर्मचारी भांडेकर ह्यानि गोळया खाल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाही आणि ह्या गोळया खाल्यानी कोणतेही नुकसान होत नाही आपण व आपल्या परिवारातील सगळ्यांनी ह्या हत्ती रोगाच्या गोळ्या खावेत जेणे करून हा रोग आपल्याला होणार नाही या बद्दल मुलांना समजावून सांगितले शहरातील सर्व नागरिकांनी हत्ती रोगाच्या गोळ्या घेऊन ह्या रोगावर नियंत्रण मिळवू या असेही भांडेकर यांनी सांगितले.
सेंट अंने हायस्कुल मूल येथील विद्यार्थीनि या कार्यक्रम ला चांगला प्रतिसाद दिला