सावली : तालुका प्रतिनिधी
येथील राणी येशोधरा इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये धुलीवंदनाचा रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.चिमुकल्या बालगोपालांनी गुलालाची उधळण करीत एकमेकांवर रंग टाकत आनंद लुटला. या सोहळ्याने संपूर्ण परिसर रंगीत झाला होता.
होळीच्या पार्श्वभूमीवर, शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांसाठी खास रंगपंचमी साजरी करण्याची योजना आखली. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.शाळेच्या प्रांगणात छोट्या बालगोपालांनी नैसर्गिक गुलाल एकमेकांवर उधळत आनंदाने न्हाऊन निघाले. मुलांच्या आनंदी हसण्याचा आवाज आणि त्यांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर रंगमय झाला
मुख्याध्यापक बोरकर सर यांनी विद्यार्थ्यांना रंगपंचमीच्या महत्त्वाविषयी माहिती दिली. “ही केवळ रंगाचा सण नाही, तर प्रेम, बंधुता आणि आनंद साजरा करण्याचा दिवस आहे,” असे त्यांनी सांगितले.शिक्षकांचा सहभाग आणि आनंदोत्सवाचा माहोल या रंगोत्सवात शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत रंग खेळला आणि त्यांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी गेडाम ठिचर, सुषमा बोरकर ठिचर, अनघा ठिचर, दिक्षा ठिचर,सोनल ठिचर, आणी सुश्रुत गणवेर, दिपक रायपुरे, विवेक भोपये यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ आणि स्पर्धा आयोजित केल्या.विद्यार्थ्यांना गुलाल सुरक्षितपणे कसा वापरावा, कोणते रंग वापरावेत आणि पर्यावरणपूरक सण कसा साजरा करावा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने “होळी रे होळी” अशा गाण्यांवर नाचत आणि गुलाल खेळत हा आनंदोत्सव साजरा केला.सणाच्या निमित्ताने सामाजिक संदेश
यावेळी विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी खेळण्याचा संकल्प केला. मुख्याध्यापक बोरकर सर यांनी “केमिकलयुक्त रंगांऐवजी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करा आणि पाणी वाया घालवू नका” असा महत्त्वाचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांचे अनुभव आणि प्रतिक्रिया
या आनंदोत्सवाबद्दल काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दुसरीतील विद्यार्थिनी अन्या सांगितले, “आजचा दिवस खूप खास होता. आम्ही सर्वांनी खूप मजा केली.” तिसरीतील विद्यार्थी सार्या म्हणाला, “आम्हाला गुलाल खेळण्याची मजा आली आणि शिक्षकांनी आम्हाला या सणाचे महत्त्व समजावले.
पालकांचा सकारात्मक प्रतिसाद
या कार्यक्रमाबद्दल पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. “बच्चांना अशा प्रकारे सण साजरा करू देणे हा खरोखरच चांगला उपक्रम आहे,” असे एका पालकाने सांगितले.
संपूर्ण परिसर रंगमय
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षकांसह कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी गुलालात न्हाऊन निघाल्यावर संपूर्ण परिसर रंगमय झाला होता. हा उत्सव विद्यार्थ्यांच्या आठवणींमध्ये कायम राहील, असे शिक्षकांनी सांगितले.
राणी यशोधरा इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये झालेल्या या रंगोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला.पर्यावरणपूरक रंगांचा वापर आणि पाण्याची बचत यासारख्या महत्त्वाच्या सामाजिक संदेशांमुळे हा उत्सव अधिक खास ठरला. भविष्यातही असेच कार्यक्रम आयोजित व्हावेत, अशी विद्यार्थ्यांची आणि पालकांची इच्छा आहे.