Tuesday, April 22, 2025
HomeUncategorizedकोरपना तालुक्यातील भोयगाव येथील घटना एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

कोरपना तालुक्यातील भोयगाव येथील घटना एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

कोरपना : अनिल गेडाम (तालुका प्रतिनिधी)

भोयगाव येथील गजानन रामदास वाटेकर या इसमाचा वर्धा नदीवरील भारोसा लगत असलेल्या भैरम घाट येते पाण्याचा अंदाज न कळल्याने पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

कोरपना तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भोयगाव येथील गजानन रामदास वाटेकर वय वर्ष अंदाजे 32 असे मृतकाचे नाव असून गजानन हा वर्धा नदीला लागून असलेल्या आपल्या शेतामधे बुधवारला सकाळी काम करण्याकरिता गेला. परंतु गजानन हा सायंकाळ पर्यत घरी आला नाही. त्यामुळे घरच्यांनी व गावकऱ्यांनी त्यांचा शोधाशोध सुरू केला परंतु त्यांचा शोध काही लागला नव्हता .दुसऱ्या दिवशी अचानक काही इसम त्यांच्या शेताकडे गेले असता त्यांनी नदीपात्राचा शोध घेतला असता गजाननचे कपडे नदीच्या पात्रात आढळून आले त्यामुळे त्यांचा पाण्यात शोध सुरू केला कालांतराने नदीच्या पाण्यामधे बनियान तरंगत दिसल्यामुले नावेच्या साहाय्याने पाहणी केली असता सकाळी अंदाजे 9 वाजता गजानन हा पाण्यात तरंगत होता. गजाननचा शोध लागताच भोयगाव येतील पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशन गडचांदूर यांना कळवले असता गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गडचांदूर येतील पोलीसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठुन पंचनामा केला व मृतदेह शव विच्छेदनासाठी गडचांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्या मृत्यू पच्यात एक पत्नी दोन मुले असा आप्त परिवार असून त्यांच्या मृत्यू मुळे शोककळा पसरली आहे व पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!