Tuesday, April 22, 2025
HomeUncategorizedभरधाव कार पुलावरून कोसळली; पती ठार, पत्नी गंभीर

भरधाव कार पुलावरून कोसळली; पती ठार, पत्नी गंभीर

गिरड : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी शिवारात स्वयंभू कंट्रक्शन कंपनी जवळ चंद्रपूरकडून नागपूरकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार चालकाचे संतुलन सुटल्याने कार पुलाला घडकून कठडा तोडून कोसळली.

यात मयुर बुर्‍हान रा. मनिषनगर नागपूर यांचा जागीच मृत्यु झाला तर ऋतिका बुर्‍हान गंभीर जखमी झाली. ही घटना आज 19 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरकडून नागपूरकडे जाणार्‍या एम. एच. 34 ए एम 9925 क्रमांकाच्या कार चालकाचे वाहनावरील संतुलन सुटल्याने भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडक देत खाली कोसळली. यात मयुर बुर्‍हान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ऋतिका बुर्‍हान गंभीर जखमी झाल्याने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!